जमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांट मध्ये स्फोट
जमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांट मध्ये स्फोट होऊन ३ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी १०:२० च्या सुमारास हा स्फोट झाला. टाटा स्टील व्यवस्थापनाच्या समन्वयाने जिल्हा प्रशासन जखमींवर योग्य उपचार व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अपघातात जखमी झालेल्या लोकांची माहिती घेतली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टाटा स्टील चा जागतिक दर्जाचा हा प्लांट असून याची सुरुवात २६ ऑगस्ट १९०७ रोजी झाली. २८ फेब्रुवारी १९०८ रोजी येथे खाणकामाला सुरुवात झाली. आशिया खंडातील हा पहिला स्टील उत्पादन प्रकल्प असून देशातील सातत्याने १०० वर्षांपेक्षा जास्ती काळ उत्पादन देणारा एकमेव प्लांट आहे.
भारतातील खाणकाम आणि जमशेदपूरमधील टाटाच्या इतिहासाबद्दल विस्तृतपणे पुन्हा केव्हातरी मी नक्की लिहीन. तूर्तास आजच्या स्फोटात जखमी झालेल्याना लवकर आराम मिळो या सदिच्छा व्यक्त करू.