खाल्या मिठाला जागणारा पत्रकार : पवन जैस्वाल.
"सरकारी यंत्रणा जोपर्यंत त्याबद्दल बोलत नाहीत तोपर्यंत सत्य लिहू नका" असं ठणकावून सांगून देखील मुलांना शालेय पोषण आहारात 'मीठ आणि रोटी दिली जातीये' हे सत्य जगासमोर मांडणारा पत्रकार; पवन जैस्वाल नुकताच कर्करोगानं मृत्युमुखी पडला.
जळजळीत सत्य समाजासमोर ठेवणाऱ्या या पत्रकारावर त्यानंतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचं पुरेपूर मानसिक खच्चीकरण करण्यात आलं. याच दरम्यान आजाराला सामोरा जात असताना त्याला कर्करोगानं गाठलं आणि या सत्यवादी, लढवैय्या पत्रकाराचा मृत्यू झाला.
आमचे हात बांधलेले होते असं निर्लज्जपणे सांगून, पत्रकारितेतील अनेकविध पुरस्कार घेऊन, गलेलठ्ठ माया जमवून ताठ मानेने समाजासमोर येणारे अनेक पत्रकार आपण आपल्या आजूबाजूलाच नव्हे तर संपूर्ण देशभर पाहतोय. आज डळमळीत होणाऱ्या लोकशाहीच्या चौथ्या खांबाला सावरू पाहणारे, अन्यायाच्या विरोधात जाणारे पवन जैस्वाल सारखे पत्रकार आहेत म्हणून देशात अजून देखील सर्वसामान्यांचा बातमीपत्रांवर विश्वास टिकून आहे.
निधड्या छातीच्या या पत्रकाराला किमान आपण आदरांजली तर देऊया.
संबंधित बातम्या इथे पहा :