आता FASTAG बंद होणार.
घ्या... नवीन बातमी. आता ही बातमी आनंददायी आहे का त्रासदायक आहे ते येणारा काळच ठरवेल. काही काळापूर्वी सुरु झाले आणि आज देखील सुरळीतरित्या सुरु नसलेली FASTAG टोल कार्यप्रणाली बंद होण्याची शक्यता रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी वर्तवली आहे.
नवीन पद्धतीत टोल वसुली ही एखाद्या वाहनाने टोल देय असलेल्या महामार्गावरून किती अंतर प्रवास केला त्या प्रमाणात GPS द्वारे मोजणी करून टोल आकारणी करण्यात येणार आहे. आज पर्यंत ही टोल आकारणी दोन टोल नाक्यांदरम्यान करण्यात येते. या पद्धतीमध्ये कमी अंतर प्रवास करून देखील जास्ती रक्कम टोल पोटी भरावी लागते.
@nitin_gadkari
@NHAI_Official
FASTAG
FASTAG India
FASTAG Toll
NHAI