शेवटी ते 'हारले'च.
शेवटी ते 'हारले'च.
व्यावसायिक, आर्थिक विवंचना फक्त तुम्हाला-आम्हालाच आहेत असं नाही. अमेरिका स्थित प्रसिद्ध मोटारसायकल कंपनी हारले-डेव्हिडसन यांनी आपला भारतातील संसार गुंडाळायचा ठरवला आहे. त्यांच्या जागतिक व्यापाराच्या ५% व्यापार भारतात आहे.
सन २००९ मध्ये भारतात उत्पादन आणि विक्री सुरु केलेल्या हारले-डेव्हिडसन यांनी गुरगाव मधील आपलं कार्यालय छोट्या स्तरावर सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असून ग्राहकांना सेवा देण्यास डीलर नेटवर्क कटिबद्ध असल्याचे देखील म्हंटले आहे.
हरियाणा मधील बवाल येथे असणारी फॅक्टरी पूर्णतः बंद करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.
खालील नमूद केलेली सर्व मॉडेल्स भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
Street 750, Street Rod, Iron 883, 1200 Custom, Forty-Eight, Roadster, Street Bob, Fat Bob, Fat Boy, Heritage Softail Classic, Road King, Street Glide Special, Road Glide Special and CVO Unlimited.
#HarleyDavidson
#HarleyDavidsonIndia