विजयदुर्गच्या सुवर्णस्मृती

Go to content

विजयदुर्गच्या सुवर्णस्मृती

Mandar Vaidya : master in web & graphics
Published by Me in Konkan tours · 28 August 2020
Tags: KonkanVijaydurga

विजयदुर्गच्या सुवर्णस्मृती

(Golden memories of fort Vijaydurga)

कोकणाबद्दल मला अगदी लहानपणापासून खूप आकर्षण वाटत आले आहे. इतके की, पुण्याला मामाकडून कोल्हापूरला येताना स्वारगेट वर पुणे - मालवण, पुणे - देवगड गाडी दिसली की, मला त्याच गाडीने तडक कोकणात जावे, असे प्रकर्षाने वाटत असे. पुढे थोडा मोठ्ठा झाल्यावर जेव्हा जेव्हा मी पुण्याहून कोल्हापूरला येत असे; तेव्हा नेहमी कोकणातल्या गाडीने प्रवास केला आहे.

आमच्या शेजारी योगायोगाने कोकणातील एक कुटुंब रहायला आले. त्यांचं गाव वाडा, तालुका देवगड. त्यांच्याशी बोलताना तर मी अगदी कोकणातच आहे असं वाटायाचं. त्यांच्या सोबत सुट्टीत एकदा वाड्याला जाण्याचा प्रसंग आला. सात-आठ एकरात पसरलेलं त्यांचं अंगण आणि अंबा-नारळीच्या बागा पाहून मी अगदी गंमतीनं म्हणालो... आम्ही कोल्हापुरातल्या घरात राहतो म्हणजे अगदी कड्याच्या पेटीतच राहतो. एक दिवस विश्रांती झाल्यावर आम्ही गेलो कुणकेश्वरला. दुसऱ्या दिवशी विजयदुर्गला. ते वळणावळणाचे रस्ते, घाट, त्या लांबवर पसरलेल्या आंब्याच्या बागा, सगळं पहिल्यांदाच पहात होतो आणि डोळ्यात साठवत देखील होतो. काळ १९८७-८८ चा.

या प्रवासातून आमची एस. टी. एकदाची पोहोचली विजयदुर्गला. सर्वत्र पसरलेला कसला तो वास श्वासागणिक  मला त्रास देत होता. नंतर कळलं की तो वाळलेल्या माशांचा वास होता. त्या वासातून श्वास घेत घेत समोर पाहिलं तर उत्तुंग विजयदुर्ग उभा. हा मी माझ्या आयुष्यात समोरून पाहिलेला पहिला किल्ला. पन्हाळा खुपदा पहिला, पण आतून, समोरून नव्हे.

विजयदुर्ग किल्ला अरबी समुद्र आणि वाघोटणची खाडी यांच्या संगमावर बांधलेला आहे.

    

अधिक माहितीसाठी भेट द्या :Created by Me for You.
Back to content