सोपा, चविष्ट आणि पौष्टीक नाचणीचा डोसा
नाश्त्याला प्रत्येकालाच नेहमी चमचमीत काहीतरी हवं असत. आज सोपा, चविष्ट आणि पौष्टीक नाचणीचा डोसा बनवूया.
नाचणीचा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :
∎ नाचणीचे पीठ १ वाटी
∎ बारीक रवा १ वाटी (मिक्सर ला फिरवून बारीक करून घेणे)
∎ तांदळाचे पीठ १ वाटी
∎ दही अर्धा कप (आंबटपणा हवा असल्यास)
∎ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
∎ बारीक चिरलेले आले
∎ कोथिंबीर बारीक चिरलेली
∎ १ कांदा बारीक चिरलेला
∎ १ चमचा जिरे
∎ चवीनुसार मीठ
∎ तेल
∎ पाणी आवश्यकतेनुसार
नाचणीचा डोसा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :
नाचणीचा डोसा बनवण्यासाठी सर्वात एक मोठे भांडे घ्या.
या भांड्यात १ वाटी नाचणी, रवा आणि तांदळाचे पीठ घेऊन व्यवस्थित मिसळून घ्या.
त्यानंतर, यामध्ये दही, आले, हिरवी मिरची, कांदा, जिरे, कांदा आणि मीठ टाका.
आता या पीठामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून डोसा बॅटर बनवून घ्या.
त्यानंतर हे पीठ ८ ते १० तास सेट करायला ठेवा. हिवाळा अथवा पावसाळा असेल तर ३-४ तास जास्त सेट करायला ठेवा.
आता गॅसवर डोसा तवा गरम करायला ठेवा.
त्यात थोडे तेल पसरून त्यावर आपण नेहमी डोसा बनवतो तसे नाचणी डोश्याचे पीठ पसरवा.
आता दोन्ही बाजूंनी थोडे तेल घालून नाचणी डोसा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
तुमचा चविष्ट आणि पौष्टीक नाचणी डोसा तयार आहे.
नारळाची चटणी, लाल चटणी, बटाट्याची भाजी हा गरमागरम नाचणी डोसा सर्व्ह करा.